हंगाम: नोव्हेंबर ते फेब्रुवारी
विदर्भ हिवाळी हुरडा पार्टी (Hurda Party Nagpur)
शेतात शेकोटीवर भाजलेला गरमागरम कोवळा हुरडा, झणझणीत ठेचा, लसूण चटणी, खोबऱ्याची चटणी आणि ग्रामीण वातावरणात चुलीवरचं जेवण!
वेळसकाळी ११:०० ते संध्याकाळी ५:३०
दर: ₹७०० प्रति व्यक्तीहुरडा पार्टीमध्ये काय काय समाविष्ट आहे?
शेकोटीच्या निखाऱ्यांवर ताज्या कणसांमधून भाजून चोळलेला गरमागरम कोवळा हुरडा.
विविध चटण्यांचा बार: शेंगदाणा चटणी, सुकं खोबरं-लसूण चटणी, हिरवा मिरची ठेचा, गूळ आणि रेवडी.
गरम उकडलेले गोड मके (स्वीट कॉर्न) आणि भाजलेली रताळी.
दुपारी संपूर्ण गावरान जेवण: चुलीवरचं पिठलं, गरमागरम ज्वारी-बाजरी भाकरी, भाजी, वरण-भात आणि गोडधोड.
संध्याकाळी गरमागरम चहा आणि स्नॅक्स.

पूर्व-बुकिंग सूचना: हुरडा पार्टीसाठी ताजी कोवळी ज्वारी त्याच दिवशी तोडली जाते. त्यामुळे कमीत कमी २४ तास आधी व्हॉट्सअॅपवर बुकिंग करणे आवश्यक आहे.